esakal | दुध विक्रीतून महिलांनी कमावले लाखो रुपये; कमाई वाचून थक्क व्हाल
sakal

बोलून बातमी शोधा

milk

शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमधून मोठा फायदा मिळतो. मात्र तो करण्याची तयारी असायला हवी. दूधाच्या व्यवसायातूनसुद्धा भरपूर नफा मिळवता येतो.

दुध विक्रीतून महिलांनी कमावले लाखो रुपये; कमाई वाचून थक्क व्हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद - शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमधून मोठा फायदा मिळतो. मात्र तो करण्याची तयारी असायला हवी. दूधाच्या व्यवसायातूनसुद्धा भरपूर नफा मिळवता येतो. याची भारतात भरपूर उदाहरणे आहेत, असंच एक उदाहरण गुजरातमध्ये आहे. सध्या भारतात आघाडीच्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये ' अमुल डेअरी'चा क्रमांक वरचा आहे. अमुल डेअरीने दुध विक्री करून लाखोंची कमाई केलेल्या महिलांची यादी दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत अमुल डेअरीचे दुध विकून लाखो रुपये मिळवलेल्या महिलांची नावे अध्यक्ष आरएस सोधी यांनी ट्विटरवर दिली आहेत. या सर्व महिला दुग्धशाळा आणि पशुपालन व्यवसायात गुंतल्या आहेत. सध्या गुजरातमध्ये अशा हजारो महिला आहेत ज्या पशुपालन आणि दुग्धव्यवसायामुळे स्वंयपुर्ण झाल्या आहेत. 

टॉप-10 ग्रामीण महिलांची लिस्‍ट 

  1. नवलबेन चौधरी  - 87 लाख 95 हजार 900 रुपये
  2. ​मालवी कनूबेन रावताभाई - 73 लाख 56 हजार 615 रुपये
  3. छावड़ा हंसाबा हिम्‍मतसिंह - 72 लाख 19 हजार 405 रुपये
  4. लोह गंगाबेन गणेशभाई  - 64 लाख 46 हजार 475 रुपये
  5. रावबड़ी देविकाबेन -  62 लाख 20 हजार 212 रुपये
  6. लीलाबेन राजपूत - 60 लाख 87 हजार 768 रुपये
  7. बिसमिल्‍लाहबेन उमतिया  58 लाख 10 हजार 178 रुपये
  8. सजीबेन चौधरी  56 लाख 63 हजार 765 रुपये
  9. नफीसाबेन अगलोदिया  53 लाख 66 हजार 916 रुपये
  10. लीलाबेन धुलिया - 52 लाख 02 हजार 396 रुपये

जगातील  दुग्ध उत्पादनात भारताचा २० टक्के वाटा असून. सध्या दुग्ध उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.  गुजरात मधील 'आनंद' शहराला दुधाची राजधानी म्हणून ओळखले जाते.  हा जिल्हा अमूल डेअरी आणि दूध क्रांतीसाठी प्रसिद्ध झाले. 'अमुल'ची स्थापना इथंच झाली. ही भारतातील आघाडीची  दुग्धव्यवसायातील कंपनी आहे.  या कंपनीची स्थापना १९४६ मध्ये झाली. ही कंपनी गुजरात मधील 'आनंद' या जिल्ह्यात आहे. 

अमुल दूध, चीज, दुधाची पावडर यासारख्या दुग्धजन्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. अमूलने केवळ दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठीच महत्त्वाची भूमिका बजावली नाही, तर दशलक्षाहून अधिक दूध उत्पादकांना रोजगाराचे साधन म्हणूनही काम केले. भारतात 70 दशकात ऑपरेशन फ्लड (Operation Flood) सुरु झालं होत. यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात दुध उत्पादन होऊन भारत दूग्धजन्य पदार्थांचा मोठा निर्यातदार बनला आहे.

loading image
go to top