Gurmeet Ram Rahim Parole : डेरा सच्चा सौदा प्रमुख आणि बलात्कार, तसेच खून प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीम याला पुन्हा एकदा तुरुंगातून पॅरोलवर (Ram Rahim 40-day Parole) सोडण्यात आलं आहे. यावेळी त्याला ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला असून तो मंगळवारी सकाळी रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून (Sunaria Jail) बाहेर पडला आणि थेट हरियाणातील सिरसा येथील डेरा आश्रमात गेला, अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.