esakal | "हेट स्पीच देणं नवी फॅशन झालीय; असे लोक कोरोनापेक्षाही घातक"
sakal

बोलून बातमी शोधा

"हेट स्पीच देणं नवी फॅशन झालीय; असे लोक कोरोनापेक्षाही घातक"

"हेट स्पीच देणं नवी फॅशन झालीय; असे लोक कोरोनापेक्षाही घातक"

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जामियामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर एका तरुणाने गोळीबार केला होता. राम भक्त गोपाल असं नाव असणाऱ्या या तरुणाने 4 जुलै रोजी हरियाणाच्या पटौदीमध्ये एक एका महापंचायतमध्ये प्रक्षोभक भाषण केलं होतं. या संदर्भात त्याला अटक केली होती आणि 4 दिवसांनंतर एका स्थानिक न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने म्हटलंय की, 'हेट स्पीच' एक नवी 'फॅशन' बनली आहे. आणि यासंदर्भात जर जामीन दिला गेला तर समाजात हा संदेश जाईल की याप्रकारचे कृत्य स्विकारण्याजोगे आहे. (Gurugram court rejected bail plea of Ram Bhagat Gopal court says Hate speech become fashion nowadays)

हेही वाचा: बिहारमध्ये 16 जणांचा संशयास्पद मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

न्यायाधीश मोहम्मद सगीर यांनी म्हटलंय की, भाषणाच्या व्हिडीओमुळे कोर्ट स्तब्ध आहे. धर्म अथवा जातीच्या आधारावर प्रक्षोभक भाषण करणे आजकाल फॅशन बनली आहे. पोलिस देखील याप्रकारच्या घटनांना आवर घालण्यासाठी असहाय्य दिसत आहेत. या प्रकारच्या घटना वास्तवात आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष चौकटीला बिघडवून टाकत आहेत आणि संविधानाच्या भावनेलाच ठेच पोहोचवत आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्र, केरळमधील रुग्णवाढ चिंताजनक; मोदींचा इशारा

न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढत म्हटलंय की, जे लोक याप्रकारचे विद्वेषी आणि प्रक्षोभक भाषण देतात आणि समाजात अशांतता निर्माण करतात, ते कोरोनासारख्या एखाद्या महासाथीपेक्षा काही कमी नाहीयेत. याप्रकारचे लोक जे सामान्य लोकांमध्ये द्वेष आणि वितंड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, वास्तवात ते देशाला महासाथीपेक्षाही अधिक नुकसान पोहोचवत आहेत.

आदेशात म्हटलंय की, या प्रकरणी पोलिसांद्वारे सादर केलेला व्हिडीओ एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो आहे. आपल्या समाजाला कोरोनाच्या लढाई लढायची गरज आहे की इतका द्वेष पसरवणाऱ्या या प्रकारच्या लोकांची गरज आहे जे आपल्या धर्मद्वेषाच्या जोरावर निर्दोषांचा जीव घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

loading image