क्रुरतेची हद्दपार! बलात्कारानंतर तिला दिले HIV इंजेक्शन

वृत्तसंस्था
Sunday, 22 December 2019

आरोपी हितेश (नाव बदललेले) हा युवतीला फसवून घेऊन गुरुग्राम येथून मथुरा येथील त्याच्या गावी घेऊन गेला. तेथे तिच्यावर त्याने बलात्कार करून व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत तिच्यावर बलात्कार करत राहिला.

गुरुग्राम : हरियानातील गुरुग्राम येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून, एका युवतीवर बलात्कार करून तिला एचआयव्हीचे (एड्स) इंजेक्शन दिल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोपी हितेश (नाव बदललेले) हा युवतीला फसवून घेऊन गुरुग्राम येथून मथुरा येथील त्याच्या गावी घेऊन गेला. तेथे तिच्यावर त्याने बलात्कार करून व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सतत तिच्यावर बलात्कार करत राहिला. युवती गर्भवती राहिल्याचे समजल्यानंतर त्याने तिला फसवून एचआयव्हीचे इंजेक्शन दिले. नियमित वैद्यकीय चाचणी दरम्यान युवतीला ही माहिती समजल्यानंतर तिने धाडस करत याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माला समोर ठेऊन काही करत नाही : पंतप्रधान मोदी

या दोघांची ओळख पूर्वीपासून होती. त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. फेब्रुवारीमध्ये तो तिला घेऊन मथुराजवळील गावी गेला होता. तेथेच ही सर्व घटना घडल्याचे समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurugram Man Assaulted A Woman And Injected HIV Positive