
गुरुग्राममधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ४६ वर्षीय एअर होस्टेस व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप एअर होस्टेसने केला आहे. गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की ते आरोपीची ओळख पटविण्यासाठी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.