Guwahati : ब्रह्मपुत्रा ते कामाख्या ‘रोप- वे’साठी प्रयत्न; आसाममध्ये प.बंगालखालोखाल महाराष्ट्रातून पर्यटक

मेघालयातील विकास प्रकल्प आणि पर्यटन स्थळांचा अभ्यास करून महाराष्ट्रातील पत्रकारांचा
Guwahati
Guwahatisakal
Updated on

गुवाहाटी -"आसाममध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. राज्यात पर्यटन क्षेत्राचा आणखी विकास होत असून ब्रह्मपुत्रा नदीपासून ते कामाख्या मंदिरापर्यंत रोप-वे सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत," अशी माहिती आसामच्या पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुमार पद्मपाणी बोरा यांनी आज दिली.

मेघालयातील विकास प्रकल्प आणि पर्यटन स्थळांचा अभ्यास करून महाराष्ट्रातील पत्रकारांचा गट आसाममध्ये आला असून आज त्यांनी आसामच्या पर्यटन विकास महामंडळाला भेट देत येथील पर्यटन क्षेत्रातील घडामोडींची माहिती घेतली. ''आसाम हे पर्यटनासाठी प्रथमपासूनच प्रसिद्ध असून येथे पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक पर्यटक येथे येतात,'' असे बोरा यांनी सांगितले. "पर्यटनाचा आणखी विकास करण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधांचा विकास करत आहोत.

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलांची उभारणी, रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगांना सवलत अशा योजना राबविल्या जात आहेत. याशिवाय चहा मळ्यांचाही पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जात आहे. नदी पर्यटनात नवनवीन सुविधा आणल्या जात असून ब्रह्मपुत्रा नदीपासून कामाख्या मंदिर असा रोप-वे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,"अशी माहितीही बोरा यांनी दिली. आसामला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून मागील आर्थिक वर्षांत जवळपास एक कोटी लोक राज्यात पर्यटनासाठी आले होते, असेही त्यांनी सांगितले.

Guwahati
S. Jaishankar:विकसित राष्ट्रांचा दुटप्पीपणा; एस जयशंकर यांनी ग्लोबल नॉर्थ देशांना सुनावलं

गुन्हेगारी ५० टक्के कमी

आसाम दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी पोलिस मुख्यालयाला भेट देत पोलिस महासंचालक ज्ञानेंद्र प्रतापसिंह आणि विशेष महासंचालक हरमितसिंह यांच्याशी संवाद साधला. मागील दहा वर्षांत गुन्हेगारीच्या संदर्भात राज्याची ओळख बदलली असून आसाममधील गुन्हेगारी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले. जनतेला अधिक चांगल्या प्रकारे सेवा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन झाले असल्याचेही सांगण्यात आले. पत्रकारांच्या गटाने कामाख्या मंदिर, आसाम प्रेस क्लबला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Uday Samant to Review Ganpatipule Development Works
Brahmaputra River Flood
Bhishacha Kada tourist safety Ratnagiri
Why did tourists clash at Sawantwadi Waterfall?
Marathi News Esakal
www.esakal.com