

TMZ
esakal
देशात टेलिकॉम उत्पादनाला चालना देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने ग्वाल्हेर येथे देशातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन (TMZ) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी मुंबईत झालेल्या विशेष गुंतवणूक परिषदेत अनेक आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. या गुंतवणुकीमुळे हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.