
मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री नरेंद्र शिवाजी पटेल यांनी ग्वाल्हेरच्या रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्यानं गोंधळ घातला. रविवारी रात्री सिटी सेंटर परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये ते गेले होते. त्या गोंधळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मंत्र्यांचे पीएसओ स्टाफशी धक्काबुक्की करताना दिसत आहेत. मंत्र्यांनी फूड सेफ्टी टीम बोलावून रात्रीच रेस्टॉरंटमध्ये अन्नाचे नमुने घेतले. रेस्टॉरंटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध करताच पोलिसांनी मालकाला सोडून दिलं.