Truck Accident: दर्शनाला निघाले, पण घरी परतलेच नाहीत! शीतला माता मंदिराच्या वाटेवर काळाचा घाला; १२ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, २९ जखमी!

Gwalior Truck Accident: 12 Devotees Killed, 29 Injured : ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराजवळ धान्याने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; १२ भाविकांचा मृत्यू, २९ जखमी, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू
A heavily loaded truck crashed into devotees travelling towards Sheetla Mata Temple in Gwalior, Madhya Pradesh. The tragic accident claimed 12 lives and injured 29 people, prompting an investigation by local authorities

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर अनियंत्रित ट्रक धावल्याची भीषण घटना रविवारी पहाटे घडली. धान्याने भरलेल्या या ट्रकने रस्त्यावरील भाविकांना चिरडल्याने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून, २९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com