ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

IAS Medha Roopam देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची आयएएस मुलगी मेधा रूपम यांना सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात नुकताच दिलासा दिला. यानंतर वकिलांच्या असोसिएशनने आक्रमक होत थेट सरन्यायाधीशांना पत्र लिहिलंय.
Lawyers Write to CJI After Medha Roopam Gets Supreme Court Relief

Lawyers Write to CJI After Medha Roopam Gets Supreme Court Relief

Esakal

Updated on

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर सध्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, दुसरीकडे त्यांची आयएएस मुलगी आणि गौतम बुद्ध नगरच्या न्यायदंडाधिकारी मेधा रूपम यांच्याविरोधात वकिलांनी सरन्यायाधीशांना खुलं पत्र लिहिलंय. वकिलांची संघटना लॉयर्स असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्यूशनने गुरुवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने मेधा रूपम यांच्याशी संबंधित प्रकरणात दिलेली खास सुविधा आणि प्राधान्य याला विरोध दर्शवलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com