

Gyanesh Kumar Security
esakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत नवीन गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. ज्ञानेश कुमार यांना यापूर्वीच ‘झेड-प्लस’ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. मात्र, नव्याने मिळालेल्या धोक्याच्या माहितीसोबतच राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनांची परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षेचा अतिरिक्त स्तर वाढवण्यात आला आहे.