खरंच औरंगजेबाने एका राणीसाठी 'काशी विश्वेश्वराचं' मंदिर पाडलं होतं?

औरंगजेबाने एका राणीसाठी 'काशी विश्वेश्वराचं' मंदिर पाडलं असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरं काय होतं
Gyanvapi masjid controversy
Gyanvapi masjid controversy

काशी विश्वेश्वर मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद बांधलेली आहे, यावरून सध्या जोरात वाद सुरू आहे. हे सगळं प्रकरण आता कोर्टात आहे. व्हिडिओग्राफी-सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आत शिवलिंग सापडल्यानंतर या संकुलाच्या ऐतिहासिक कथेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याशिवाय मुघल सम्राट औरंगजेबाने काशीतील विश्वेश्वर मंदिर का नष्ट केले. यावरून सोशल मीडियावर वर काही मेसेज व्हायरल होत आहे.

औरंगजेबाने विश्वनाथ मन्दिर का पाडले ? औरंगजेब बंगालला वाराणसीवरून जात होता। सोबतच्या हिंदू राजांनी विनंती केली " येथे एक दिवस थाम्बावे। आमच्या राण्या गंगेत स्नान करून भगवान विश्वनाथाचे दर्शन घेतील।" विनंती मान्य झाली। सर्व राण्या पालख्या मधून गंगास्नान आणि पुजेसाठी गेल्या। कच्छची राणी सोडुन सर्व राण्या परत आल्या। संपूर्ण मंदिरात शोधले पण राणी सापडली नाही। औरंगजेबाला ही घटना कळल्यावर तो संतापला। त्याने राणीला शोधण्यासाठी सेनाधिकार्याना पाठविले। सैन्याने सम्पूर्ण मंदिर शोधल्यावर त्याना आढळले की भिंतीत बसविलेली गणपतीची मूर्ती सरकविता येते। मूर्ती सरकविली गेल्यावर तळघरात जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या। तेथे हरविलेली राणी रडत होती। तिच्यावर अतिप्रसंग झालेला होता। हे तळघर भगवान विश्वनाथाच्या बरोबर खाली होते। सर्व राजांनी या प्रसंगाचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली। औरंगजेबाने आदेश दिला की हे पवित्र स्थान आता अपवित्र झाले असून भगवान विश्वनाथाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा। मंदिर पाडून टाका आणि पूजार्याला अटक करून शासन करा।. असा मेसेज सोशल मीडियावर वर व्हायरल होत आहे.

पण इतिहासाच्या पानात विश्वेश्वर मंदिर का पाडले याच्या अनेक कथा नोंदवल्या आहे. यातील एक कथा म्हणजे पट्टाभी सीतारामय्यांची कथा. त्याच्या फिदर अँड स्टोन्स या पुस्तकात संदर्भ देत त्यांनी औरंगजेबाने मंदिर का पाडले हे सांगितले आहे. पट्टाभी सीतारामय्या यांच्या कथेबाबत, यूपीने लखनऊ विद्यापीठाचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध इतिहासकार रवी भट्ट यांनी सांगितली आहे. ते म्हणतात, औरंगजेबावर सर्वाधिक लिहिणारा इतिहासकार म्हणजे जदुनाथ सरकार. जदुनाथ सरकार सारखा अभ्यास औरंगजेबावर कोणीही लेखकाने केलेले नाही. त्यांनी एका पर्शियन पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. ज्याचे नाव मासिर-ए-आलमगीरी आहे. मासिर-ए-आलमगीरी लिहिणाऱ्या इतिहासकाराचे नाव साकी मुस्तैद खान आहे.

औरंगजेबाचा जन्म 1658 ते 1707 या काळात झाला आणि मुस्तैद खानचे पुस्तक औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी 1710 मध्ये पूर्ण झाले. एप्रिल १६६९ मध्ये औरंगजेबाने विश्वेश्वर मंदिर पाडण्याचा आदेश दिला आणि सप्टेंबरमध्ये मंदिर पाडण्याची माहिती औरंगजेबाला देण्यात आली. परंतु त्या पुस्तकात या प्रकारच्या वाक्याचा उल्लेख नाही. पट्टाभी सीतारामय्या यांनी त्यांच्या फिदर अँड स्टोन्स या पुस्तकात त्यांच्या एका मौलानाच्या हस्तलिखिताचा संदर्भ देत मोठा दावा केला आहे. त्यांनी पुस्तकात लिहिले आहे की, राणी मंदिर दाखविण्याच्या नावाखाली पुरोहितांने व भाविकांने राणी तळघरात आणून त्यांच्याकडील दागिने लुटले. पुरोहितांच्या या कृत्याबद्दल औरंगजेबला जेव्हा कळले तेव्हा त्याला खूप राग आला. ते देवाचे घर असू शकत नाही आणि मंदिर पाडले गेले. पण राणीची सुटका झाली त्या ढिगाऱ्यावर मशीद बांधण्यास सांगितले आणि तिला खुश करण्यासाठी मशीद बांधल्या गेली. त्यामुळे काशी विश्वनाथ मंदिराच्या शेजारी मशीद अस्तित्वात आली.

पट्टाभि सीतारामय्या हे लेखका आधी डॉक्टर होते आणि नंतर ते राजकीय कार्यकर्ते बनले. त्यांचे संपूर्ण आयुष्य राजकारणात गेले आहे. नंतर ते मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल झाले, ते कधी इतिहासकार नव्हते. फिदर अँड स्टोन्स या पुस्तकात त्यांनी कोणत्याही सूत्रांचा उल्लेख केलेला नाही. जो इतिहासकार असतो नेहमी त्यांच्या सूत्रांचा उल्लेख करतो. मौलानाने सीतारामय्यांच्या एका मित्राला याबाबत सांगितले होते आणि गरज पडल्यास हस्तलिखित दाखवू असे सांगितले होते. नंतर मौलाना मरण पावले आणि सीतारामय्या यांचेही निधन झाले, परंतु ते त्यांच्या मित्राचे आणि लखनौच्या मौलानाचे नाव कधीच सांगितल नाही. पुस्तकातील मौलानाचा उल्लेख सत्य म्हणून कोणताही इतिहासकार मान्य केल नाही. सीतारामय्या यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला त्यांचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरेसा पुरावा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com