मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद तुरुंगातून घरात

वृत्तसंस्था
Friday, 27 November 2020

मुंबईवर २६-११ रोजी करण्यात आलेल्‍या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला तुरुंगातून गुपचूप घरामध्ये हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालत असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नवी दिल्ली - मुंबईवर २६-११ रोजी करण्यात आलेल्‍या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला तुरुंगातून गुपचूप घरामध्ये हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालत असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदला काही दिवसांपूर्वी दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे तो तुरुंगातच असायला हवा होता. मात्र त्याला तुरुंगातून काढून घरी हलविण्यात आले आहे. लाहोरमधील जोहर टाऊनमधल्या घरातून तो दहशतवादी कारवाया करत असल्याचे वृत्त पाकिस्तानातील माध्यमांच्या हवाल्याने काही इंग्रजी माध्यमांनी दिले आहे. हाफीज सईदला यापूर्वी जुलै २०१९मध्ये अटक करण्यात आली होती.

कायद्याची भाषा सर्वांना समजेल अशी असायला हवी - पंतप्रधान मोदी

फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (‘एफएटीएफ’) काळ्या यादीतून सुटका करून घेण्यासाठीच हाफिज सईदच्या अटकेचा बनाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यात लष्करे तैय्यबाचा म्होरक्या झाकी उर रेहमान लखवीने सईदची त्याच्या घरी जाऊन भेट घेतल्याचीही माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. लखवीचाही मुंबईवरील हल्ल्यात हात होता. मात्र त्याच्यावरही पाकिस्तानने कारवाई केलेली नाही. भारतातील दहशतवादी हल्ल्याबाबतचा सईदविरुद्धचा खटला रावळपिंडी व इस्लामाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे. 

पुण्याच्या तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं; बिहार पोलिसांवर कारवाईचे आदेश

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला एक तप पूर्ण होत असताना पाकिस्ताने या हल्ल्यातील सहभागी १९ ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांवर कारवाईच केलेली नाही. या हल्ल्यातील सात दहशतवाद्यांवर सध्या खटला सुरू असून त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पाकिस्तानने प्रयत्न केलेले नाहीत. ‘मोस्ट वाँटेड’ घोषित केलेल्या १९ दहशतवाद्यांच्या ठावठिकाणाबद्दल सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hafiz Saeed mastermind 26th november terror attack on Mumbai is out of jail