UP Election : सन २०१४ नंतर भाजपप्रणित युतीनं दिला पहिला मुस्लीम उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UP Elections
UP Election : सन २०१४ नंतर भाजपप्रणित युतीनं दिला पहिला मुस्लीम उमेदवार

UP Election : सन २०१४ नंतर भाजपप्रणित युतीनं दिला पहिला मुस्लीम उमेदवार

लखनऊ : सन २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपप्रणित युतीच्यावतीनं (BJP Alliance) मुस्लिमांना उमेदवारी नाकारण्यात येत होती, पण आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच्या अपना दलाकडून (Apna Dal) एक मुस्लीम उमेदवार देण्यात आला आहे. (Haider Ali Khan first candidate after 2014 BJP alliance for UP elections)

हेही वाचा: पत्रावर पत्र! भाजपनंतर आता प्रताप सरनाईकांचं राज्यपालांना पत्र

हैदर अली खान असं अपना दलच्या उमेदवाराचं नाव असून तो सुआर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. या मतदारसंघासाठी सातव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. हैदर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या नूर बानो यांचे नातू आहेत. हैदर हे यासाठी चर्चेत आले आहेत कारण ते असे पहिले मुस्लीम उमेदवार बनले आहेत ज्यांना २०१४ नंतर भाजपप्रणित युतीनं पहिल्यांदच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी तिकीट दिलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: ऊर्जामंत्री नाराज, राज्य सरकार मदत करत नसल्याचा आरोप

३६ वर्षीय हैदर यांना काँग्रेसकडून उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलं होतं. पण त्यांनी काँग्रेसला रामराम करत अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलमध्ये प्रवेश केला. यानंतर आता अपना दलनं त्यांना उमेदवारी दिली आहे. हैदर अली खान हे अब्दुल्ला आझम यांच्याविरोधात लढणार आहेत. जे समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान यांचे पुत्र आहेत.

हेही वाचा: "तुझे बाबा जर मला..." चंद्रकांत पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

हैदर हे रामपूरच्या राजघराण्याचे वारस असून युकेच्या एस्सेक्स विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली आहे. हैदर यांचे वडील नवाब काझीम खान हे उत्तर प्रदेशमध्ये सोआर येथून विधानपरिषदेवर आमदार होते. तर बिलासपूर येथून चार वेळा आमदार राहिले आहेत.

Web Title: Haider Ali Khan First Candidate After 2014 Bjp Alliance For Up Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top