Hajj News : हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी; केंद्राकडून मोठा निर्णय जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hajj

Hajj News : हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी; केंद्राकडून मोठा निर्णय जाहीर

Hajj 2023 News : पवित्र हज यात्रेमधील व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता हज यात्रेसाठीचा ‘व्हीआयपी‘ कोटाच रद्द केला आहे. यानुसार राखीव ठेवण्यात येणाऱया जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य हज यात्रेकरूंना यात्रेची पर्वणी साधता येईल आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Flights Shutdown in US : संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा ठप्प; हजारो प्रवासी अडकले

भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अल्पसंख्याक मंत्री तसेच हज समितीचे सदस्य यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या जवळपास सर्व व्हीआयपी कोट्याच्या जागा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सर्व सामान्य यात्रेकरूंप्रमाणे हजमध्ये सहभागी होतील. कोणासाठीही ‘विशेष व्यवस्था‘ किंवा आरक्षण असणार नाही.

हेही वाचा: Farmer Protest : PM मोदींनी शंभरहून अधिक लोकांसमोर माफी मागितली; NRI व्यावसायिकाच्या दाव्याने खळबळ

यंदाची यात्रा निर्बंधमुक्त

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. कोरोनामुळे प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानेही जगभरातील देशांसाठी प्रवाशांचा कोटाही कमी केला होता.

मात्र आता २०२३ च्या हज यात्रेत कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. यंदा ७० वर्षांवरील यात्रेकरूंनाही हजला जाता येणार आहे.

हेही वाचा: Ebola Outbreak : कोरोना रूग्णवाढीत WHO कडून मोठी घोषणा

भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांसाठीचा कोटा सौदी अरेबियाने भारतातील प्रवाशांचा कोटा २५ हजारांनी वाढवून आता दोन लाखांपर्यंत यात्रेकरूंना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा भारतीय मुस्लिम अनुदानाशिवाय हज करू शकतील.

सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भारतीयांसाठीचा कोटा वाढविण्याची घोषणा केली होती. या निर्णयानंतर भारतातील सर्व राज्यांमधून अर्ज केलेल्या बहुतांश लोकांना यात्रेला जाण्याची संधी मिळाली. यापूर्वी हजारो लोकांचे आरक्षण प्रलंबित होते तेही आता मार्गी लागेल.

या निर्णयानंतर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहार यांसारख्या मोठ्या राज्यांतील सर्व हज अर्जदार या वर्षी यात्रेला जाऊ शकतील उत्तर प्रदेशातून हज यात्रेसाठी सर्वाधिक यात्रेकरू अर्ज करतात. या एका राज्यातून ३० हजारांहून अधिक लोकांना ‘हज'चा लाभ मिळू शकेल.

हेही वाचा: Modi Cabinet : BHIM UPI च्या ट्रांजॅक्शनवर मिळणार इन्सेटिव्ह; वाचा महत्त्वाचे निर्णय

जेद्दाह येथे दोन्ही देशांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय कराराचा भाग म्हणून वरील घोषणा करण्यात आली. सौदी अरेबियाचे हज आणि उमराह उपमंत्री डॉ. अदेलफताह बिन सुलेम माश आणि भारताचे महावाणिज्यदूत मोहम्मद शाहिद आलम यांनी जेद्दाह येथील माजी कार्यालयात कोटा वाढविण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

‘‘ व्हीआयपी कोटा रद्द करण्यामुळे हज यात्रेकरूंना सुविधाजनक ठरेल असा विश्वास वाटतो. सौदी अरेबियाने भारतीयांचा कोटा वाढविण्याचाही निर्णयही हजारो सर्वसामान्य भारतीय हज यात्रेकरूंना खूप फायदेशीर ठरणार आहे.''

- सईद अंसारी - राजकीय जाणकार