Belgaum News: खानापूर तालुक्यात मराठी शाळांवर कन्नड शाळांचा ग्रहण! दोन मुलांसाठी सुरू केली शाळा, गावकऱ्यांमध्ये संताप
Kannada school: खानापूर तालुक्यातील मराठी माध्यम शाळा अस्तित्वाच्या संकटात सापडल्या आहेत, कारण त्याच आवारात नवीन कन्नड शाळा सुरू केल्या जात आहेत. या निर्णयामागे प्रदेशाची भाषिक ओळख बदलण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
खानापूर: तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. तसेच या गावांमध्ये लोकसंख्या अतिशय कमी असल्याने सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी कमी- जास्त होत असते.