दिव्यांग मुलाला विमानात प्रवेशबंदी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiraditya Scindia

दिव्यांग मुलाला विमानात प्रवेशबंदी...

नवी दिल्ली : रांची विमानतळावर इंडिगोच्या विमानात एका दिव्यांग मुलाला प्रवेश नाकारल्यावरून नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे संतप्त झाले आहेत. अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाणार नाही व याच्या चौकशीवर स्वतः लक्ष ठेवून आहोत असे शिंदे यांनी म्हटले आहे. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी या दिव्यांग मुलाला विमानात प्रवेश नाकारल्याबद्दल विमान वाहतूक प्राधिकरणानेही गंभीर दखल घेतली असून घटनेबाबत विस्ताराने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो चर्चेचा विषय झाला. शिंदे यांनी नाराजी जाहीर करताना म्हटले, की प्रवाशांबरोबर अशा प्रकारची वर्तणूक सहन केली जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारच्या प्रसंगातून जाण्याची वेळ येऊ नये. माझ्या देखरेखीखालीच प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.

‘इंडिगो’ची दिलगिरी

इंडिगोच्या विमानात दिव्यांग मुलाला प्रवेश नाकारल्याच्या घटनेची दखल विमान वाहतूक मंत्र्यांनी घेऊन कारवाईचा इशारा दिल्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोन्जॉय दत्त यांनी दिलगिरी व्यक्त केली. संबंधित मुलाला इलेक्ट्रिक व्हिलचेअरची भेट देण्याचा प्रस्तावही ठेवला. ते म्हणाले, की दिव्यांग व्यक्तींचा सांभाळ करण्यात आयुष्यखर्ची घालणारे पालक हे खरे हिरो आहेत, हे आम्हालाही माहीत आहे. अशा दुर्दैवी अनुभवाला सामोरे गेलेल्या या कुटुंबाप्रती दिलगिरी व्यक्त करतो.

Web Title: Handicapped Person No Entry Into Aircraft Jyotiraditya Scindia Angry Indigo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top