

Hanuman Jayanti : उद्या होणाऱ्या हनुमान जयंती देशभरात साजरी होणार आहे. पण राम नवमीच्या दिवशी देशातील विविध भागांत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय अलर्टवर आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. (Hanuman Jayanti Home Ministry on alert mode after violence creats at Ram Navami)
हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं नवी अॅडव्हाजरी जाहीर केली आहे. यामध्ये सर्व राज्यांना हनुमान जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सणानिमित्त सर्वत्र शांतता राहावी तसेच समाजातील कोणी जातीय सलोख्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतंय का? याकडं राज्यांच्या पोलिसांनी लक्ष द्यावं, असंही या अॅडव्हाजरीमध्ये गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
दरम्यान, राम नवमीच्या दिवशी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये हिंसाचार झाला होता. तसेच पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार या राज्यांमध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळं उत्सवाला गालबोट लागलं होतं. यावरुन बरेच राजकीय आरोप-प्रत्यारोपही पहायला मिळाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.