ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Haridwar ESIC Medical College, 50 MBBS Seats, 2027-28 या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली असून २०२७-२८ पासून प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
haridwar new medical college

haridwar new medical college

esakal

Updated on: 

उत्तराखंड: उत्तराखंडमधील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) हरिद्वारमध्ये नवीन ESIC मेडिकल कॉलेज स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या महाविद्यालयात प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

ESICच्या ३० जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या १९८व्या बैठकीत हरिद्वारमध्ये नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. हे कॉलेज हरिद्वारमधील सध्या कार्यरत असलेल्या ESIC रुग्णालयाच्या उपलब्ध पायाभूत सुविधा आणि संसाधनांचा वापर करून सुरू केले जाणार आहे. अधिकृत माहितीनुसार, २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून ५० MBBS प्रवेशांचे वार्षिक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com