

"Ganga water returns to 'Har Ki Pauri' in Haridwar after 18 days."
Sakal
देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हरिद्वारमधील प्रसिद्ध 'हर की पौडी'सह सर्व प्रमुख घाटांवर तब्बल १८ दिवसांनंतर पुन्हा एकदा पवित्र गंगा नदीचे खळाळते पाणी परतले आहे. दसऱ्याच्या रात्रीपासून सुरू झालेली वार्षिक 'गंगा बंदी' अखेर अधिकृतपणे समाप्त झाली असून, शनिवारी रात्री उशिरा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर रविवारी दिवाळीच्या दिवशी हर की पौडीचे सर्व घाट पुन्हा पाण्याने तुडुंब भरले आहेत.