
उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीथक्षेत्र हरिद्वारमध्ये मंसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीची घटना समोर आली आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी या घटनेत ७ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाने बचावकार्य आणि मदतकार्य सुरु केले आहे.