Hariyana Violence:मणिपूरनंतर आता हरियाणातही उफळला हिंसाचार! २५०० लोकांना घ्यावा लागला मंदिरात आसरा

Vehicles burned in Hariyana:हरियाणाच्या नूहमध्ये धार्मिक यात्रेदरम्यान मोठा हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारामुळे जवळपास २५०० पुरुष,महिला आणि लहान मुलांनी मंदिरात शरण घेतली आहे.
hariyana Violence
hariyana Violence Esakal

Hariyana Violence:हरियाणाच्या नूहमध्ये धार्मिक यात्रेदरम्यान मोठा हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारामुळे जवळपास २५०० पुरुष,महिला आणि लहान मुलांनी मंदिरात शरण घेतली आहे. हिंसाचाराच्या दरम्यान कार, गांड्यावर दगडफेक करुन आग लावण्यात येत आहे. पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टिअरगॅसचा वापर करण्यात आला आणि हवेत गोळीबारही करण्यात आला. याशिवाय अतिरिक्त सुरक्षा दलाच्या गाड्या देखील बोलवण्यात आल्या आहेत.

सुत्रांकडून घटनास्थळी गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी पोलीसांनी सांगितलं की २० पेक्षा जास्त लोकांना इजा झाली आहे. परिस्थिती पाहून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहेत.

जलाभिषेक यात्रा काढण्यात येत होती

मिळालेल्या माहितीनुसार, हा हिंसाचार गुरुग्रामजवळील नूह या ठिकाणी घडला आहे. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेद्वारे बृजमंडळ जलाभिषेक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही यात्रा गुरुग्राम-अलवर राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली होती, तेव्हा काही तरुणांच्या टोळीने त्याच्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. हिंसाचार इतका वाढला की या जमावाने शासकीय आणि वैयक्तिक वाहनांना लक्ष्य करण्यात आली.

सध्या या यात्रेत सामील असणाऱ्या २५०० लोकांनी नल्हार महादेव मंदिरात शरण घेतली आहे. त्यांच्या गाड्या मंदिराच्या बाहेर आहेत. लोकांना या ठिकाणाहून काढण्यात पोलीसांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. सांगण्यात येतंय की, सोशल मिडीयावर एक व्हिडीयो पोस्ट झाल्यानंतर हा हिंसाचार उफाळला.(Latest Marathi News)

hariyana Violence
Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांचा पंतप्रधान मोदींबाबत खळबळजनक विधान; म्हणाले निवडणुकीआधी...

काय होतं त्या व्हिडीयोमध्ये?

सांगण्यात येतंय की, हा हिंसाचार एका व्हिडीयोमुळे उफाळून आला.सुत्रांच्या माहितीनुसार, बजरंग दलाचे सदस्य मोनू मानेसर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा व्हिडीयो सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. हा व्यक्ती अनेक गुन्ह्यांमध्ये संशयीत आहे. या दोघांनी हे देखील आव्हान दिले होते की ही यात्रा मेवात या ठिकाणी थांबणार आहे. काही लोकांनी दावा केलाय की त्यांनी या दोघांना यात्रेत पाहिलंय.(Latest Marathi News)

hariyana Violence
मनोहर भिडे हे अफजल खानाचा वकील कृष्णाजीचे वंशज, त्यामुळे बदललं नाव; यशोमती ठाकूर यांचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com