

Durga Puja Celebrations Feature Harry Potter Magic as Hogwarts Inspired Decor Brings a Mysterious Fantasy World to Life
esakal
जमशेदपूर (झारखंड) : दुर्गापूजेनिमित्त झारखंडमधील जमशेदपूर शहरात आकर्षक पंडाल उभारण्यात आले आहेत. यंदा कदमा राणीकुदर येथील हिंद क्लबने साकारलेला ‘हॅरी पॉटर’ थीमवरील पंडाल विशेष चर्चेत आहे. ब्रिटिश लेखिका जे. के. रोलिंग यांच्या जगप्रसिद्ध काल्पनिक जादुई विश्वाची झलक या पंडालमध्ये पाहायला मिळत आहे. गूढ प्रकाशयोजना, स्वयंचलित हालचाल करणारे पुतळे आणि थरारक ध्वनी यांमुळे हा देखावा भाविकांसह लहान मुलांचेही लक्ष वेधून घेत आहे.