esakal | पतीचे वर्क फ्रॉम ऑफिस सुरू करा; पत्नीचे पत्र व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Work From Home

पतीचे वर्क फ्रॉम ऑफिस सुरू करा; पत्नीचे पत्र व्हायरल

sakal_logo
By
सुधीर काकडे

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका हे नेहमी वेगवेळ्या विषयांवर ट्विट करत असतात. गोयंका यांचे ट्विट भन्नाट असल्याने नेटकरी देखील त्यावर भरभरुन व्यक्त होत असतात. त्यांनी नुकतंच केलेलं एक ट्विट सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गोयंका यांनी कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने लिहीलेलं हे पत्र ट्विट केलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतंय.

हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्विटरवर कंपनीतील कर्मचाऱ्याने लिहीलेलं पत्र शेअर केलं आहे. या पत्रात कर्मचाऱ्याच्या पत्नीने एक वेगळीच मागणी केली. पत्नीने या पत्रात आपल्या पतीचे वर्क फ्रॉम होम बंद करुन वर्क फ्रॉम ऑफिस सुरु करण्याची मागणी केली आहे. या पत्रात कर्मचाऱ्याच्या पत्नीने, मी आपल्या कंपनीतील कर्मचारी मनोजची पत्नी आहे. आपल्याला विनंती करते की, आपण आता वर्क फ्रॉम ऑफिस सुरु करा, नाही तर आमचं लग्न मोडेल.’

हेही वाचा: खाद्य तेलांच्या किंमती होणार कमी; केंद्रानं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

‘माझ्या पतीने कोरोनाची लस देखील घेतली आहे. तसेच ते कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करतात. जर आपण त्यांना ऑफिसमध्ये बोलवलं नाही, तर आमचं लग्न मोडेल. ते दिवसभर फक्त कॉफी पीतात, या खोलीतुन त्या खोलीत फिरत असतात. ते भरपुरवेळा जेवण मागत असतात. ते काम सुरु असताना झोपल्याचं देखील मी पाहिलं आहे. आम्हाला दोन मुलं आहेत, मला त्यांची काळजी घ्यावी लागते, कृपया माझं म्हणनं समजून घ्या आणि माझी मदत करा’ असे म्हणत आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

loading image
go to top