

Social media influencer Harsha Richhariya at Mahakumbh 2025, who later announced her decision to return to the glamour world after facing criticism and personal challenges during her spiritual journey.
esakal
मागील वर्षी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात संतांच्या रथावर साध्वीच्या वेषात उपस्थित राहून लक्ष वेधून घेतलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया ही धर्माच्या मार्गावरून दूर होऊन परत ग्लॅमरच्या दुनियेत जाण्याची घोषणा केली आहे. प्रयागराजमध्ये माघ पौर्णिमेला संगमात डुबकी मारल्यानंतर हर्षा ग्लॅमरच्या दुनियेत परतणार आहे. हर्षाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही घोषणा केली. हर्षाने म्हटले आहे की, "या माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर मी धर्माच्या मार्गावर चालण्याचा माझे व्रत संपवीन." तिने असेही म्हटले आहे की, "हा निर्णय बंडखोर मानसिकतेतून घेतला आहे."