भाजपला मोठा झटका; काँग्रेस 'या' पक्षासोबत सत्ता स्थापनेच्या तयारीत?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणूक यांचे निकालाचे सुरवातीचे कल समोर आले आहेत. हरयाणा राज्यात भाजप सत्तेत असून तिथे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एकूण 90 पैकी 36 जागांवर भाजप पहिल्या कलानुसार आघाडीवर आहे. तर, काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे.

चंदीगड : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरयाणा विधानसभा निवडणूक यांचे निकालाचे सुरवातीचे कल समोर आले आहेत. हरयाणा राज्यात भाजप सत्तेत असून तिथे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एकूण 90 पैकी 36 जागांवर भाजप पहिल्या कलानुसार आघाडीवर आहे. तर, काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे.

भारतीय जनता पक्षातून बाहेर पडून दुष्यंत चौटाला यांनी पक्ष स्थापन केला होता. त्यांचा जेजीपी नावाचा पक्ष हा एकूण 12 जाागांवर आघाडीवर आहे. तसेच, दुष्यंत चौटाला यांनी जेजीपीच्या हाती सत्तेच्या चाव्या राहतील असं म्हटलं होतं त्यामुळे काँग्रेस हरियाणामध्ये जेजीपीसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मतदान २१ ऑक्टोबर रोजी पार पडलं होतं. 90 पैकी 46 जागा जिंकणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापन करता येणार असून सध्याची परिस्थिती ही त्रिशंकू असल्याने काँग्रेस ही जेजीपीसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल असे सूत्रांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana assembly election 2019 Result