BJP:...तर मुख्यमंत्रीपदावर दावा करेन, 'या' भाजप नेत्याने केले वक्तव्य

Latest Political News: ९० विधानसभा मतदारसंघांसाठी पाच ऑक्टोबरला निवडणूक होईल.
BJP:...तर मुख्यमंत्रीपदावर दावा करेन, 'या' भाजप नेत्याने केले वक्तव्य
Updated on

Haryana Vidhansabha News: हरियानात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर आल्यास आपण मुख्यमंत्रिपदावर दावा करू, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल विज यांनी आज केले.

हरियानामध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यास नायबसिंह सैनी हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, असे भाजपने नुकतेच स्पष्ट केले आहे. मात्र, विज यांच्या या दाव्यामुळे पक्षापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सैनी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही पक्षाने घोषित केले आहे. हरियानातील ९० विधानसभा मतदारसंघांसाठी पाच ऑक्टोबरला निवडणूक होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com