esakal | 'इंदिरांना मारलं तर मोदी काय चीज?', शेतकरी आंदोलनात खलिस्तानींच्या घोषणेचा खट्टर यांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

khattar

शेतकरी मुद्द्यांवरून पंजाब, हरियाणा सरकार आमने सामने आले आहेत. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजप सरकारवर शेतकऱ्यांविरुद्ध शस्त्र उचलण्याचा आणि त्यांना भडकावण्याचा आरोप केला आहे. 

'इंदिरांना मारलं तर मोदी काय चीज?', शेतकरी आंदोलनात खलिस्तानींच्या घोषणेचा खट्टर यांचा दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंदिगढ - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कृषी विधेयकांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानी कनेक्शन असल्याचा पुनरुच्चार केला आहे. खट्टर यांनी शनिवारी गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने या आंदोलनामध्ये खलिस्तानी सहभागी असल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटलं की, आमच्याकडे इनपुट आहेत की काही समाजकंटक या गर्दीमध्ये घुसले आहेत. आमच्याकडे याचे रिपोर्ट आहे. आताच याचा खुलासा करणं योग्य नाही. त्यांनी थेट घोषणाबाजी केली आहे. जे ऑडिओ आणि व्हिडिओ समोर आले आहेत त्यामध्ये इंदिरा गांधी यांच्याबाबत स्पष्ट घोषणा देताना दिसत आहे. ते म्हणत आहेत की, जर इंदिरा गांधींसोबत करू शकलो तर मोदीबाबत काय अवघड आहे. 

पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक शिख शेतकरी एका न्यूज चॅनेलच्या रिपोर्टने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिसतो. शेतकरी म्हणतो की, आम्ही तर इंदिरा गांधींनाही मारलं मग मोदींचे काय आहे.. यासोबतच बर्नालामध्ये काही आंदोलक शेतकरी जरनल सिंह भिडरावाले यांच्या फोटोसह दिसले. 

शेतकरी मुद्द्यांवरून पंजाब, हरियाणा सरकार आमने सामने आले आहेत. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजप सरकारवर शेतकऱ्यांविरुद्ध शस्त्र उचलण्याचा आणि त्यांना भडकावण्याचा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना खट्टर यांनी म्हटलं की, कॅप्टन कोरोना काळात शेतकऱ्यांना भडकावत आहेत. त्यांचा जीव धोक्यात घालत आहे. यावर पुन्हा अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. भाजप सरकारच कोरोना काळात कृषी विधेयक लागू करण्यास आले होते. 

हे वाचा - 'दिल्ली चलो' शेतकरी आंदोलनाची बैठक सुरु; सरकारकडून तीन डिसेंबरला चर्चेसाठी निमंत्रण

मनोहर लाल खट्टर यांच्या उत्तरानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा निशाणा साधला. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, खट्टरजी, मी तुमचं उत्तर ऐकून आश्चर्यचकीत झालो. तुम्ही मला नाही तर शेतकऱ्यांना एमएसपीच्या मुद्द्यावर विश्वासात घ्या. तुम्ही त्यांच्या दिल्ली चलो मार्चच्या आधी माझ्याशी बोलायला हवं होतं. जर तुम्हाला वाटतं की मी शेतकऱ्यांना भडकावत आहे तर हरियाणाचे शेतकरीसुद्धा या आंदोलनात का सहभागी होत आहेत असा सवालही कॅप्टन अमरिंदर यांनी खट्टर यांना विचारला.

loading image
go to top