हरियाणातील ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश; शरद पवारांची ट्विटद्वारे माहिती

haryana ekta shakti party maratha virendra varma joins NCP in presence of harad pawar
haryana ekta shakti party maratha virendra varma joins NCP in presence of harad pawar

नवी दिल्ली : एकता शक्ती पक्षाच्या नेत्यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. हरियाणातील एकता शक्ती पक्षाचे अध्यक्ष वीरेंद्र मराठा यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. वीरेंद्र वर्मा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला याचा मला आनंद आहे, असे पवारांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, वीरेंद्र वर्मा हे हरियाणा च्या करनाल जिल्ह्यातील आहेत. करनाल हा असा जिल्हा आहे ज्यामध्ये खाद्यसंकट संपवण्याची क्षमता आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य मुल्य अद्यापही मिळालेलं नाही. वीरेंद्र वर्मा यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करेल असे शरद पवार म्हणाले आहेत. आम्हाला हरियाणा येथे एनसीपी पक्षाची बांधणी मजबूद करु इच्छिते, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले जाईल असेही पवार म्हणाले आहेत.

haryana ekta shakti party maratha virendra varma joins NCP in presence of harad pawar
'या' रणनितीनुसार विरोधक लढणार २०२४ ची निवडणूक? शरद पवारांचे सूचक विधान

दरम्यान शरद पवार यांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत समान किमान कार्यक्रमाच्या आधारे निवडणूक लढवावे असे आवाहन केली. तसेच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक करताना नितीश कुमार यांनी भाजपशी संबंध तोडून वेगळे सरकार स्थापन केले, आम्ही त्याचे स्वागत करतो असे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भाजपचा उद्देश फक्त छोट्या पक्षांना सत्तेतून बेदखल करणे आहे अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला होता.

haryana ekta shakti party maratha virendra varma joins NCP in presence of harad pawar
शाहरुख खानच्या घरी गणरायाचे आगमन, कुटुंबाने केली प्रतिष्ठापना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com