
Senior Citizens Pension Hike
ESakal
दिवाळीपूर्वी हरियाणा सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी जाहीर केले की, वृद्धांसाठी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन ३,००० रुपयांवरून ३,२०० रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. ही वाढलेली रक्कम नोव्हेंबर २०२५ पासून लागू होईल. या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील अंदाजे २० लाख वृद्ध लाभार्थ्यांना होईल.