भाजप मंत्री म्हणतात, राहुल-प्रियांका तर लाईव्ह पेट्रोल बॉम्ब

वृत्तसंस्था
Wednesday, 25 December 2019

हरियानाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी काँग्रेसच्या या दोन प्रमुख नेत्यावर जहरी टीका केली आहे. त्यांनी थेट राहुल व प्रियांका यांना 'लाईव्ह पेट्रोल बॉम्ब'ची उपमा दिली आहे. 

चंदीगड : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नेहमीच भाजपकडून टीका होते. पण आता राहुलसह प्रियांकावरही टीका होताना दिसते. हरियानाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी काँग्रेसच्या या दोन प्रमुख नेत्यावर जहरी टीका केली आहे. त्यांनी थेट राहुल व प्रियांका यांना 'लाईव्ह पेट्रोल बॉम्ब'ची उपमा दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हरियानाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी ट्विट करत राहुल व प्रियांकावर शरसंधान साधले आहे. 'राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यापासून सावध राहा, ते लाईव्ह पेट्रोल बॉम्ब आहेत. ते जिथे जातात तिथे ऐग भडकते आणि ते सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू शकतात.' असे वीज यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. 

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

प्रियांका व राहुल यांना मेरठमध्ये अडविण्यात आले होते. ते दोघं सीएएविरोधातील आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना भेटायला गेले होते. त्यानंतर वीज यांनी हे ट्विट केले आहे. उत्तर प्रदेशात या आंदोलनात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान प्रियांका व राहुल यांनाही कुटूबियांना भेटू दिले नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haryana Home minister Anil Vij criticized Rahul and Priyanka Gandhi