
Haryana IPS Puran Kumar Suicide Note Highlights Administrative Tensions
esakal
IPS Puran Kumar Death Case : हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) वाय. पूरन कुमार यांनी मंगळवारी चंदीगडमधील राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून जीव दिल्याने केल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.
दुपारी 1:30 वाजता त्यांनी घराच्या साउंडप्रूफ तळघरात सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमधून त्यांच्या कार्यालयातील तणाव आणि असमाधानाची कारणे समोर आली आहेत.