पंजाब सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात हरियाणा विधानसभेत ठराव मंजूर; दोन राज्यांत वाद वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manohar Lal Khattar

'पंजाब सरकारचा निर्णय हरियाणातील जनतेला मान्य नाहीय.'

पंजाब सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात हरियाणा विधानसभेत ठराव मंजूर

चंदीगड : चंदीगडवर (Chandigarh) आपलाच हक्क आहे, असं सांगत हरियाणा आणि पंजाब सरकार (Punjab Government) आमनेसामने आली आहेत. आज चंदीगडबाबत हरियाणा विधानसभेनं एकमतानं ठराव मंजूर केलाय. दरम्यान, चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशावर दावा करण्याच्या प्रस्तावाबाबत पंजाब विधानसभेनं चिंता व्यक्त केलीय. हरियाणा विधानसभेनं मंजूर केलेल्या ठरावात म्हंटलंय, 'पंजाब सरकारचा निर्णय हरियाणातील जनतेला मान्य नाहीय. त्यामुळं हरियाणानं चंदीगडवर आपला हक्क कायम ठेवलाय.'

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी सरकारनं सभागृहात मांडलेल्या ठरावाला एकमतानं पाठिंबा दिल्याबद्दल प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या सदस्यांचं आभार मानलेत. खट्टर म्हणाले, या प्रस्तावावर सुमारे तीन तास चर्चा झाली. तत्पूर्वी हा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी यमुना कालव्याचं बांधकाम आणि हिंदी भाषिक भाग राज्यात हस्तांतरित करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा: RSS च्या पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुस्लिम डॉक्टराविरुध्द फतवा

सीएम खट्टर यांनी भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशात हरियाणाच्या अधिकाऱ्यांच्या तैनातीशी संबंधित मुद्दा देखील उपस्थित केलाय. शेजारच्या पंजाबनं चंदीगडचा केंद्रशासित प्रदेश आम आदमी पार्टी (AAP) शासित राज्यात तात्काळ हस्तांतरित करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर, हरियाणा सरकारनं राज्य विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. मुख्यमंत्री पुढं म्हणाले, हरियाणा राज्यासाठी तसंच चंदीगडसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. पंजाबच्या आप सरकारनं निवडणुका संपल्यानंतर लगेचच चंदीगडचा मुद्दा का उपस्थित केला?, असा सवाल त्यांनी केलाय.

Web Title: Haryana Legislative Assembly Passes Resolution On Chandigarh Issue Manohar Lal Khattar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..