RSS च्या पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुस्लिम डॉक्टराविरुध्द फतवा

Rashtriya Swayamsevak Sangh
Rashtriya Swayamsevak Sanghesakal
Summary

डॉक्टर भारती यांनी आरएसएसच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करून गावात स्वागत केलं.

मुरादाबाद : मुरादाबादच्या मैनाथेर पोलीस स्टेशन (Mainather Police Station) परिसरात आरएसएसच्या पथसंचलनाचं स्वागत करणं एका मुस्लिम डॉक्टरला चांगलंच महागात पडलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (Rashtriya Swayamsevak Sangh) स्वागत करणाऱ्या मुस्लिम डॉक्टर निजाम भारती (Doctor Nizam Bharti) यांच्याविरोधात फतवा काढण्यात आलाय. आरएसएसच्या (RSS) कार्यक्रमात सामील झाल्यामुळं त्यांच्यावर बहिष्कार घालून मशिदीत न येण्याची घोषणा करण्यात आलीय. याबाबत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Rashtriya Swayamsevak Sangh
'महाराष्ट्र केसरी'ची नवी ओळख महिला कुस्तीगिरांना मिळावी : दिपाली सय्यद

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 2 एप्रिलला मैनाथेर पोलीस स्टेशन हद्दीतील महमूदपूर माफी गावात पथसंचलन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉ. निजाम भारती यांच्यासह त्यांचे मित्रमंडळी सहभागी झाले होते. त्यांनी आरएसएसच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करून गावात स्वागत केलं. या प्रकारामुळं काही मुस्लिम संतप्त झाले आणि त्यांनी डॉ. निजाम भारती यांच्याविरोधात मशिदीत आणि शहरात बंदी घालण्यासाठी फतवा जारी केला.

Rashtriya Swayamsevak Sangh
सोमय्यांकडं किती लक्ष द्यायचं हे ठरवण्याची वेळ आलीय : शंभूराज देसाई

त्यानंतर डॉक्टर निजाम भारती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गावातील रहिवासी इम्रान वारसी यानं डॉक्टर भारती यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याविरोधात फतवा काढल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलिसांनी फतवा काढणाऱ्या इम्रान वारसीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com