Haryana Caseesakal
देश
पत्नी-प्रियकराच्या छळामुळं पतीनं घेतला गळफास; महाराष्ट्र पोलिस दलाशी कनेक्शन? प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ पाठवला अन्..
Haryana Case : हरियाणामधील डोभ गावात राहणाऱ्या मगन उर्फ अजय या तरुणाने पत्नीच्या विश्वासघातामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
डोभ : हरियाणामधील डोभ गावात राहणाऱ्या मगन उर्फ अजय या तरुणाने पत्नीच्या विश्वासघातामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Haryana Case) उघड झाली आहे. आत्महत्येपूर्वी मगनने एक व्हिडिओ रेकॉर्ड (Video Record) करून पत्नी दिव्या आणि तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानं सांगितलं की, 'हे दोघं मिळून माझ्यावर वडिलांची हत्या करण्यासाठी दबाव टाकत होते.'