Farmer Land Dispute: 125 वर्षांपूर्वी पूर्वजांनी 90 रुपयाला गहाण ठेवली होती दीड एकर जमीन, शेतकऱ्याच्या कुटुंबाने अशी मिळवली परत

Farmer News: 125 वर्षापूर्वी पूर्वजांनी गहाण ठेवलेल्या जमीनीचा ताबा मूळ शेतकऱ्याला मिळणार आहे. IAS अधिकारी अशोक खेमका या प्रकरणात निकाल दिला आहे.
Farmer Land Dispute
Farmer Land Disputeesakal

Farmer News: हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एका कुटुंबाला 1.6 एकर जमिनीचा ताबा मिळणार आहे. त्यांच्या पूर्वजांनी ही जमीन 125 वर्षांपूर्वी 90 रुपयांना गहाण ठेवली होती. 17 जून 1999 मध्ये बिरु या शेतकऱ्याने ही जमीन गहाण  ठेवली होती.

दरम्यान IAS अधिकारी अशोक खेमका यांनी त्यांच्या अर्ध-न्यायिक अधिकारांतर्गत या वर्षी 30 जूनपूर्वी जमीन मूळ जमीन मालकाच्या वारसांना सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. मूळ जमीन मालकाचे नऊ वारस कुरुक्षेत्रातील इस्माईलाबाद उप-तहसीलमधील माजरी कलान आणि ठोळ या दोन शेजारील गावातील आहेत.

बीरु शेतकऱ्याने 90 रुपयाला त्याच्या वाटणीतील जमीन प्रभू यांच्या कुटुंबाकडे गहाण ठेवली होती. गहाण खात्यानुसार, जमिनीतून मिळणाऱ्या कमाईतून कर्जावरील व्याज आणि तत्कालीन सरकारला देय महसूल मिळत असे. यासाठी कोणतीही कालमर्यादा ठरवण्यात आली नव्हती.  कर्ज 90 रुपये असताना, 1900 मध्ये देय असलेला जमीन महसूल रुपये 2 आणि 9 आणे होता. पुढे, तारण करारामध्ये व्याजदराची कोणतीही अट नव्हती. (Farmer News)

मूळ जमीन मालकाच्या वकिलांनी खेमका यांच्या न्यायालयात सांगितले की गेल्या 125 वर्षापासून जमीन गहाण आहे. ज्यांच्याकडे जमीन गहाण आहे ते कोणताही हिशोब न करता अतिरीक्त वसुली करत आहेत.

Farmer Land Dispute
Entertainment News: लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली 'ही' मराठमोळी अभिनेत्री; शेअर केले नवऱ्यासोबतच्या पिकनिकचे खास फोटो

खेमका यांनी कोणता निर्णय दिला?

गहाण खातेदारांना दिलेल्या कर्जाच्या विरूद्ध 1.6 एकर इतकी जमीन शेतीचा ताबा उपभोगात मिळाली आहे. मात्र गहाण खातेदारांकडून मुख्य देणे रक्कमेच्या विरुद्ध अतिरिक्त नफा दाखवणारे आणि त्याच रकमेचा वापर दर्शवणारे हिशोबाचे विवरण देण्यात आले नाही, असे आदेशात म्हटले आहे.

मुख्य कर्ज रक्कम वाढलेली नाही. तर गेल्या 125 वर्षांच्या कालावधीत जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असेल. या क्षेत्रातील (1.6 एकर) गहाण ठेवलेल्या जमिनीचे सध्याचे भाडे वार्षिक अंदाजे 80,000ते 90,000 रुपये आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी द पंजाब रिस्टिट्यूशन ऑफ मॉर्गेज लँड्स ऍक्ट, 1938 कायद्यानुसार शेतकऱ्यांना सावकारीच्या व्याजापासून दिलासा दिला. तसेच मूळ जमीन मालकाच्या कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला आणि गहाण ठेवलेली जमीन परत करण्याचे आदेश दिले.

Farmer Land Dispute
Maharashtra News: सागरी महामंडळाची मालवाहतुकीत भरारी; २५ वर्षांतील सर्व विक्रम मोडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com