Nuh Violence: नूह हिंसाचारात पाकिस्तानी कनेक्शन?; पोलिसांकडून तपास, 200 जणांना अटक

हरियाणाच्या नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणात पाकिस्तान कनेक्शन असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे
nuh clashes
nuh clashesANI

Haryana nuh violence Pakistan connection

नवी दिल्ली- हरियाणाच्या नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणात पाकिस्तान कनेक्शन असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नूह जिल्ह्यात सुरु झालेला हिंसाचार गुरुग्रामसह इतर जिल्ह्यात पसरला होता. पोलिस यासंदर्भात तपास करत असून यावर टिप्पणी करण्याचे टाळले, पण यात पाकिस्तानचा हात असल्याची दाट शक्यता असल्याचं ते म्हणाले आहेत. हरियाणा पोलिस कायदा आणि सुव्यवस्था एडीजी ममता सिंह म्हणाले की, नूह आणि मेवात क्षेत्रात परिस्थिती हळू-हळू नियंत्रणात येत आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

पाकिस्तानातील काही लोकांकडून युट्यूबवर हिंसाचाराचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. पोलिस अधिकारी ममता सिंह म्हणाले की, 'विशेष शोध पथक या मुद्द्यावर लक्ष ठेवून आहे. याप्रकरणात तपास सुरु आहे. पण, यावर अधिक काही बोलता येणार नाही.' माहितीनुसार आतापर्यंत 24 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी 216 लोकांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याप्रकरणी 24 एफआयआर दाखल करण्यात आले असून चार लोकांना अटक करण्यात आली आहे.

nuh clashes
Nuh Violence: एक रॅली, तीन हजारांचा जमाव..४ मृत्यू; हरियाणा हिंसाचारामागील कारण काय?

खट्टर सरकारची कारवाई

हिंसाचाराचे केंद्र ठरलेल्या नूह जिल्ह्यात राज्य सरकारकडून अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनेक घरांना पाडण्यात आलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की यातील अनेक घरे हिंसाचार करणाऱ्या लोकांची होती. पोलिसांनी सांगितलं की, सरकारी जमीनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांची घरे उद्धवस्त केली जात आहेत. यात अनेक घरे रोहिंग्या मुस्लिमांची असल्याचं बोललं जातंय.

nuh clashes
Haryana Nuh Violence: हरियाणा पोलिसांनी दंगलखोरांच्या झोपड्यांवर फिरवला बुलडोझर; योगींची आली आठवण

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदू संघटनांनी नूह जिल्ह्यात धार्मिक मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी दंगलखोरांकडून परिसरातील वाहनेही जाळण्यात आली. त्यामुळे नूह जिल्ह्यात हिंसाचार उफाळला. हिंसाचाराचे लोण पाहता पाहता गुरुग्रामसह इतर जिल्ह्यातही पसरले. हिंसाचारात आतापर्यंत 6 लोकांचा जीव गेलाय. सध्या राज्यात सामान्य स्थिती असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 1992 नंतर हरियाणातील ही सर्वात मोठी धार्मिक दंगल असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com