Haryana Nuh yatra News : 800 लोकांच्या जमावाने दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; यात्रेवर केला हल्ला; एफआयआर दाखल

Haryana Nuh yatra News : शेकडो लोकांनी दगडफेक केली. काठ्या आणि पेट्रोल बॉम्बने हल्ला केला
Nuh yatra News
Nuh yatra Newssakal

Haryana Nuh yatra News : हरियाणा येथील नल्हार येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने नूह येथे काढलेल्या धार्मिक मिरवणुकी वेळी दंगल उसळली होती.यावेळी गोळीबार आणि दगडफेकही झाली होती. सुमारे 2,500 लोकांना मंदिरात आश्रय घ्यावा लागला होता.

याबाबत पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आहे, यात त्यांनी म्हटले आहे की, नल्हार येथील शिवमंदिरापासून विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक निघाली. यावेळी 800-900 लोकांचा जमावाने 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या. याचबरोबर मारण्याच्या उद्देशाने' लाठ्या, दगड आणि बेकायदेशीर शस्त्रे घेऊन मंदिराकडे नीघाले.

Nuh yatra News
Narendra Modi to NDA MP: मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, PM मोदींचा NDA खासदारांना संदेश

याचबरोबर एफ.आय.आर मध्ये असेही म्हटले आहे कि, जवळच्या शेतातून शिव मंदिरावर हल्ला करण्यात आला. शेकडो लोकांनी दगडफेक केली. काठ्या आणि पेट्रोल बॉम्बने हल्ला केला.

Nuh yatra News
Jay Shah Asia Cup 2023 : जय शहा आशिया कपच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानात जाणार, अश्रफ खरं बोलतात की खोटं?

सोमवारी नूहमध्ये धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक आणि गाड्या पेटवल्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. या चकमकींमध्ये दोन होमगार्ड आणि एका मौलवीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Nuh yatra News
Nagpur Crime News: नागपूर पुन्हा हादरलं! सेन्ट्रल जेलमध्ये गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार अन् मारहाण

गुरुवारी, गुरुग्राममध्ये एका मशिदीला आग लागल्यानंतर ताज्या हिंसाचाराची नोंद झाली तर हरियाणाच्या नूह जिल्ह्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, असे पोलिसांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. एक मशीद विजय चौकाजवळ आहे, तर दुसरी पोलिस ठाण्याजवळ आहे. दोन्ही मशिदींचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com