Narendra Modi to NDA MP: मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधन साजरे करा, PM मोदींचा NDA खासदारांना संदेश

Narendra Modi to NDA MP
Narendra Modi to NDA MP
Updated on

Narendra Modi to NDA MP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NDA मधील खासदारांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारने मुस्लिम महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी 'तिहेरी तलाक'वर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांना मुस्लिम महिलांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यास सांगितले आहे. सोमवारी रात्री पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील एनडीएच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी ही सूचना केली. सोमवारी पहिल्या दोन बैठका झाल्या. कानपूर-बुंदेलखंड प्रदेशापर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशातील सुमारे ४५ एनडीए खासदारांच्या सभेलाही मोदींनी संबोधित केले आहे.

या बैठकीत मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवी समाजातील विविध घटकांसाठी केंद्र सरकारच्या विकास उपक्रमांवर चर्चा केली. या बैठकीत सहभागी झालेल्या काही खासदारांनी सांगितले की, पंतप्रधानांनी समाजातील प्रत्येक घटकाशी स्वत:ला जोडण्यावर भर दिला. भाजप पसमंदा (मागास) मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी काम करत आहेत.

Narendra Modi to NDA MP
US Aliens : अमेरिकेने लपवून ठेवले एलियन्सचे मृतदेह; माजी नेव्ही अधिकाऱ्याचा थेट संसदेत दावा! काय आहे प्रकरण?

वास्तविक या बैठकांच्या माध्यमातून २०२४ च्या निवडणुकीपूर्वी एनडीएतील घटक पक्षांशी संबंध दृढ करण्याची भाजपची रणनीती आहे. सध्या युतीत ३८ पक्ष आहेत. अलीकडे भाजपने पसमंदा मुस्लिमांना जोडण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले. तसेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले.

Narendra Modi to NDA MP
मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com