esakal | पती पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; ३ चिमुकल्यांना पाजलं विष
sakal

बोलून बातमी शोधा

 Suicide

कुटुंब प्रमुखाला सकाळी पाच जणांचे मृतदेह घरात दिसताच मोठा धक्का बसला.

पती-पत्नीची आत्महत्या; गळफास घेण्याआधी ३ मुलांना पाजलं विष

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हरयाणातील पलवल जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावात ही घटना घडली असून घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये पती पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट आढळलेली नाही. मात्र शेजाऱ्यांनी हे कौटुंबिक वादातून झाल असेल असं म्हटलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी तीन मुलांना विष देऊन मारलं. मंगळवारी रात्री पती पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री दोघांनी मुलांना आधी विष दिलं त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

हेही वाचा: विवाहित महिलेसह प्रियकराची गावकऱ्यांनी काढली विवस्त्र धिंड

कुटुंब प्रमुखाला सकाळी पाच जणांचे मृतदेह घरात दिसताच मोठा धक्का बसला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये नरेश (वय ३३) पत्नी आरती (वय ३०) यांच्यासह सात वर्षांचा मुलगा, ९ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षांच्या पुतणीचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत.

loading image
go to top