esakal | विवाहित महिलेसह प्रियकराची गावकऱ्यांनी काढली विवस्त्र धिंड | extramarital affair
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

विवाहित महिलेसह प्रियकराची गावकऱ्यांनी काढली विवस्त्र धिंड

sakal_logo
By
दीनानाथ परब

दुमका: विवाहबाह्य संबंध (extramarital affair) ठेवणाऱ्या जोडप्याला (couple) विवस्त्र करुन त्यांची संपूर्ण गावभर धिंड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या (Jharkhand) दुमका जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. दुमका (dumka) जिल्ह्यातील बादताल्ली पंचायतीमधील गावात ही धक्कादायक घटना घडली.

गावातल्या लोकांनी विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराला विवस्त्र करुन त्यांची गावभर धिंड काढली. महिला आणि तिचा प्रियकर दोघेही रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. मंगळवारी प्रियकर महिलेला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याला पकडून बंधक बनवले. गावकऱ्यांनी दोघांना विवस्त्र करुन गावभर त्यांची धिंड काढली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: प्रायव्हेट जेटमध्ये असं बसलं पाहिजे, प्रियंकाचा फोटो पाहाच!

जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत दोघांना गावकऱ्यांनी फिरवलं. पोलिसांना या बद्दल समजल्यानंतर त्यांनी लगेच कारवाई केली. पीडीत महिलेचा नवरा वर्षभरापासन तुरुंगात बंद आहे. महिलेची आर्थिक स्थिती बेताची असून ती रोजंदारीवर मजूर म्हणून काम करत होती.

हेही वाचा: पुण्यातील तीन गावांचा प्रश्न, अजित पवार-थोरातांमध्ये महत्त्वाची बैठक

कामाच्या निमित्ताने तिची एका व्यक्ती बरोबर ओळख झाली. तो सुद्धा तिथे काम करत होता. मंगळवारी महिला घरी परतली. तिने प्रियकराला भेटण्यासाठी बोलावले. तो घराच्या आत गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला आणि महिलेला पकडले.

loading image
go to top