Haryana Political Crisis: राजकीय भूकंप! निवडणुकीआधीच भाजप सरकार कोसळणार? माजी उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ काँग्रेसचं राज्यपालांना पत्र

Haryana Political Crisis: हरियाणाच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. हरियाणामध्ये राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाच्या राज्यपालांना पत्र लिहिलं आहे.
Haryana Political Crisis
Haryana Political CrisisEsakal

Haryana Political Crisis: हरियाणाच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. हरियाणामध्ये राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी हरियाणाच्या राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना विधानसभेचे अधिवेशन बोलावून फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केली आहे. हरियाणातील भाजप सरकारचा तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे आणि अशा परिस्थितीत सरकार अल्पमतात आले आहे.

माजी उपमुख्यमंत्री आणि जेजेपी नेते दुष्यंत चौटाला म्हणाले की, आम्ही सध्याच्या सरकारला पाठिंबा देत नाही आणि हरियाणात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. दुष्यंत चौटाला यांनी पत्रात लिहिले की, दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर सभागृहाचे संख्याबळ 88 झाले आहे. अशा स्थितीत भाजपकडे ४०, काँग्रेसकडे ३०, जेजेपीकडे ६, हलोपा आणि आयएनएलडीकडे प्रत्येकी १ आमदार आहे. त्यामुळे सरकारकडे बहुमताचे आकडे नाहीत.

Haryana Political Crisis
Gujrat Video: 'माझ्या बापाची EVM आहे'; भाजप नेत्याचा मुलाने मतदान केंद्रातूनच केलं इन्स्टाग्राम लाईव्ह

दुष्यंत चौटाला यांनी लिहिले की, तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, सरकारकडे विश्वासदर्शक ठराव नाही, त्यामुळे सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलावून फ्लोअर टेस्ट पास करावी.

बुधवारी मुख्यमंत्री नायब सैनी यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे नेते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सरकार अल्पमतात नसून जोरदार काम करत आहे. सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही.

Haryana Political Crisis
Lok Sabha Election: मतदान करा अन् मोफत मिळवा पोहे-जिलेबी, सिनेमाचं तिकीट.. कुठे मिळतायत या भन्नाट ऑफर्स? जाणून घ्या

हरियाणातील राजकीय गणित काय आहे?

माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि आझाद रणजीत चौटाला यांच्या राजीनाम्यानंतर, 90 सदस्यीय हरियाणा विधानसभेत सध्या 88 आमदार आहेत, तर नायब सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला बहुमतासाठी 45 चा आकडा गाठावा लागेल. सरकारला सध्या 44 आमदारांचा पाठिंबा आहे, ज्यात भाजपचे 40, आझादचे 2 आणि हरियाणा लोकहित पार्टीचे 1 आमदार गोपाल कांडा यांचा समावेश आहे.

तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे. 12 मार्च रोजीच भाजपने खट्टर यांना हटवून नायब सैनी यांना हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनवले होते. दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह यांचा मुलगा दीपेंद्र हुड्डा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

Haryana Political Crisis
Navneet Rana: ' तुम्हाला 15 मिनिट पण आम्हाला फक्त 15 सेकंद लागतील...'; नवनीत राणांच्या वक्तव्यावरुन AIMIM आक्रमक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com