Gujrat Video: 'माझ्या बापाची EVM आहे'; भाजप नेत्याचा मुलाने मतदान केंद्रातूनच केलं इन्स्टाग्राम लाईव्ह

BJP leader son allegedly goes live: गुजरातमधील दाहोज मतदारसंघातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
BJP leader son
BJP leader sonEsakal

गांधीनगर- गुजरातमधील दाहोज मतदारसंघातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भाजप नेत्याच्या मुलाने मतदान केंद्रामध्ये जाऊन इन्स्टाग्रामवर लाईव्ह केल्याचा आरोप आहे. तसेच, लोकांच्या वतीने मतदान टाकल्याचा देखील आरोप आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मोठा वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नेहा कुमारी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आरोपी तरुणाने ईव्हीएमसोबत लाईव्ह व्हिडिओ केला होता. गुजरातच्या माहिसागर जिल्ह्यातील हा प्रकार आहे. व्हायरल व्हिडिओ जिल्ह्यातील संतरामपूर विधानसभा मतदारसंघातील असल्याचं कळतंय. विजय भाभोर या व्यक्तीने मतदान केलं, त्यानंतर इन्स्टाग्रामवर ईव्हीएमसोबत लाईव्ह व्हिडिओ केला.

BJP leader son
Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

व्हिडिओमध्ये तरुण म्हणताना दिसत आहे की, 'हे ईव्हीएम माझ्या बापाचे आहे.' व्हिडिओमध्ये दिसतंय की, व्यक्ती स्वत: ईव्हीएमचे बटण दाबत आहे आणि लोकांना मतदान झालं असं सांगत आहे. लोकांना तो परत जाण्यास सांगत आहे. याशिवाय, ईव्हीएमला घेऊन घरी जाण्याची भाषा देखील तो बोलत आहे.

मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असते, पण या तरुणाने मोबाईल फोन केंद्रामध्ये नेले आणि ईव्हीएमसोबत व्हिडिओ देखील केला. ईव्हीएमसोबत तो खेळण्यासारखं खेळत असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुण स्थानिक भाजप नेत्याचा मुलगा असल्याची माहिती आहे.

BJP leader son
Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

तरुणाच्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर भाजप नेत्याच्या मुलाने हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटवला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ आता दिसत नाही. पण, व्हिडिओ डिलिट होण्याआधीच काहींनी हा व्हिडिओ डाऊनलोड केला होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा प्रकार धक्कादायक असल्याचं लोक बोलत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com