गुरुग्राम : हरियाणातील प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरिया (Rahul Fazilpuria Attack) याच्यावर सोमवारी रात्री गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी फाजिलपुरिया याला लक्ष्य करत गोळ्या झाडल्या. मात्र, त्यानं प्रसंगावधान राखत स्वतःची कार वेगाने चालवली आणि गावाकडे पळून जात आपला जीव वाचवला.