esakal | स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण; भाजपची सत्ता असणाऱ्या राज्याचा मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

Employment_}

हरियाणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी मागणी वाढत होती. या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये विधानसभेमध्ये यासंबंधी विधेयक सादर करण्यात आले होते.

स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण; भाजपची सत्ता असणाऱ्या राज्याचा मोठा निर्णय
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या यांनी मंगळवारी 75 टक्के रोजगाराच्या बिलाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, प्रदेशच्या तरुणांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. हे बिल मंजुर झाल्याने आता तरुणांना खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांनामध्ये 75 टक्के आरक्षणाचा अधिकार मिळेल. कंपनी, सोसायटी, ट्रस्टमध्ये हरिणातील तरुणांना 75 टक्के आरक्षण असणार आहे. 'एनडीटीव्ही' या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. हरियाणाच्या लोकांना राज्यातील 75 टक्के खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचे विधेयक हरियाणा विधानसभेत मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मंजूर झाले होते. 

हरियाणाचे डिप्टी सीएम दुष्यंत चौटाला यांनी यावेळी म्हटलं होतं की, आम्हाला आशा आहे की राज्यपालही याला लवकरच मंजुरी देतील आणि त्यामुळे हरियाणामध्ये तरुणांना येणाऱ्या काळात रोजगार मिळेल. नव्या मंजुर झालेल्या बीलामुळे हरियाणातील लोकांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण मिळणार आहे. हरियाणातील लोकांसाठी हा मोठा निर्णय असल्याचं मानलं जातं आहे. 

Hathras: योगींच्या राज्यात गुडांराज; पीडितेच्या आक्रोशाचा व्हिडिओ व्हायरल

हरियाणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी मागणी वाढत होती. या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये विधानसभेमध्ये यासंबंधी विधेयक सादर करण्यात आले होते. याला विधानसभेकडून मंजूरी मिळाली होती. त्यानंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हा प्रस्ताव राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी आज या विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्यामुळे स्थानिकांना खासगी क्षेत्रातील नोकऱ्यामध्ये 75 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे स्थानिकांना फायदा होणार आहे. शिवाय इतर राज्येही याचे अनुकरण करण्याची शक्यता आहे.