Hathras: योगींच्या राज्यात गुडांराज; पीडितेच्या आक्रोशाचा व्हिडिओ व्हायरल

hathras.
hathras.

नवी दिल्ली- 'प्लीज मला न्याय द्या..त्याने माझी छेड काढली, त्यामुळे माझ्या वडिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याने संतापून माझ्या वडिलांना गोळी मारली. ते सात-आठ लोक होते, त्यांनी माझ्या वडिलांच्या डोक्यात गोळी घातली. छातीवर गोळी मारली. कमरेवर गोळी मारली. त्याच्याविरोधात पूर्वीपासूनच केस सुरु होती. वडील शेतात काम करत होते.  माझे वडील एक चांगले व्यक्ती होते. तो आला आणि त्याने माझ्या वडिलांच्या छातीत गोली मारली, गौरव शर्मा नाव आहे त्याचं गौरव शर्मा', अशी शोकाकूल प्रतिक्रिया पीडितेने दिली आहे. पीडितेने ही सर्व शोकांतिका मीडिया आणि पोलिसांसमोर सांगितली आहे. पीडितेच्या वडिलांना काही लोकांनी शेतात येऊन गोळी घातली आहे. पीडितेचे दु:ख तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पीडित मुलगी आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे ज्याप्रमाणे आक्रोश करत आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

छेडछाडीची केस मागे घेण्यासाठी आरोपीने एका शेतकऱ्यांनी हत्या करुन टाकली आहे. जवळजवळ दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये हाथरसच्या सासन भागातील नौजरपूरमध्ये शेतकऱ्याने आपल्या मुलीची छेड काढल्याचा आरोप गौरव शर्मा नावाच्या एका युवकावर केला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली होती. त्यावेळी तो 15 दिवस तुरुंगात होता. पण, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. 

जामिनावर बाहेर असलेला आरोपी गौरव त्याच्यावरील केस मागे घेण्याचा दबाब पीडित कुटुंबीयावर टाकायचा. पण, पीडित कुटुंबीयांनी केस मागे घेतली नाही. सोमवारी शेतात बटाटे काढणाऱ्या शेतकऱ्याची भर दिवसा गोळ्या मारुन हत्या करण्यात आली. मृत वडिलाच्या मुलीने गौरवसह सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

सोमवारी शेतकऱ्याची पत्नी आणि मुलगी जेवण देण्यासाठी शेतात केली होती. त्याचवेळी आरोपी एका पांढऱ्या गाडीमधून आला. त्याने बेछूट गोळीबार केला. शेतात काम करणारे काही मजूर भीतीने लपले. पण, वडिलांना गोळ्या लागल्या. उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com