
Crime News: प्रसिद्ध हरयाणवी मॉडेल शीतल हिची गळा चिरून हत्या करण्यात आलीय. रविवारी रात्री उशिरा तिचा मृतदेह खरखौदा इथल्या खांडा आणि झरोठी गावा दरम्यान आढळून आला. रिलायन्सच्या कालव्यात तिचा मृतदेह सापडला. हरियाणवी म्युझिक अल्बममध्ये तिनं काम केलं होतं. शीतलचा तिच्या मित्रासोबत वाद झाला होता आणि त्यातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.