संसद परिसरात आंदोलनाला खरंच आणलीए बंदी? सचिवालयानं दिलं स्पष्टीकरण

आंदोलनाला बंदी घातल्यानं मोठा गदारोळ माजला होता.
parliment
parlimentsakal

नवी दिल्ली : संसद भवन परिसरात खासदारांना आंदोलनं, धरणे आंदोलनं आणि धार्मिक कार्यक्रम करायला बंदी घालण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. पण खरंच अशी प्रकारे बंदी घालण्यात आली आहे का? याचं उत्तर लोकसभा सचिवालयानं दिलं आहे. (Has protest really been banned in Parliament house area secretariat gave an explanation)

संसद भवन परिसरात अशा प्रकारे आंदोलनांना बंदी घालणं म्हणजे खासदारांच्या लोकशाही हक्कांचं उल्लंघन असल्याचं बोललं जात होतं. तसेच अनेकांनी यावरुन टीकाही केली होती. यासर्व गदारोळानंतर खुद्द लोकसभा सचिवालयानं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

parliment
संसदेत आंदोलनावर बंदी नाही; शरद पवारांचं स्पष्टीकरण

सचिवालयानं सांगितलं की, अशा प्रकारचे निर्देश देणं ही कृती सामान्य आहे. लोकसभेच्या प्रत्येक अधिवेशापूर्वी अशा प्रकारचे निर्देश दिले जातात. त्यामुळं हे काही खास आदेश आहेत असं नाही तर तो संसद भवनातील कामाकाजाचा भाग असल्याचंही सचिवालयानं स्पष्ट केलं आहे.

संसदेत आंदोलनावर बंदी नाही - शरद पवार

शरद पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले, आम्हाला लोकसभा अध्यक्षांकडून याबाबतीत निवेदन मिळालं आहे. संसदेच्या आवारात निषेध करण्यास परवानगी नाही, असे कोणतेही निर्बंध नाहीत. उद्या दिल्लीत सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com