संसदेत आंदोलनावर बंदी नाही; शरद पवारांचं स्पष्टीकरण

शरद पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांची संजय राऊतांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.
sharad pawar
sharad pawarsakal
Updated on

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर असंसदीय शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच संसदेच्या आवारात आंदोलनं, निदर्शनं करण्यावरही बंदी घातल्याची माहिती हाती येत आहे. मात्र याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

sharad pawar
संसद भवन परिसरात खासदारांना निदर्शनं, आंदोलनांना बंदी!

शरद पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवार म्हणाले की, आम्हाला संसदेच्या अध्यक्षांकडून याबाबतीत निवेदन मिळालं आहे. संसदेच्या आवारात निषेध करण्यास परवानगी नाही,असे कोणतेही निर्बंध नाहीत. उद्या दिल्लीत सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहेत.

संसदेचं पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) १८ जुलैपासून सुरु होत आहे. दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या कामकाजासंदर्भात नवा आदेश आल्याची माहिती हाती आली होती. पार्लमेंट हाऊसच्या (Parliament House) परिसरात आंदोलनं, धरणं आंदोलनं तसेच उपोषणासाठी आणि धार्मिक कृतीसाठी वापरता येणार नाही, यावर पूर्णपणे बंदी असेल, असं या आदेशातून सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com