
#OhMyGOD! पत्रकारांशी बोलताना गोंधळले मोदी? VIDEO व्हायरल
सध्या ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंडिंग होत आहे, तो म्हणजे #OhMyGOD. तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल हा हॅशटॅग कशाच्या संदर्भात आहे? हा हॅशटॅग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका व्हिडीओसंदर्भात आहे. हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. काँग्रेसनेही हा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींना पत्रकारांनी घेरलेलं आहे आणि ते मोदींना प्रश्न विचारत आहेत. त्यावर मोदी म्हणाले, "ओ माय गॉड, मी विचारतो हे कसं झालं." मोदींनी माध्यमांना दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर #OhMyGOD ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअऱ करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
युवक काँग्रेस नेते श्रीनिवास बी व्ही यांनीही हा व्हिडीओ ट्विटरवर शेअऱ केला आहे. टेलिप्रॉम्प्टरशिवायच आयुष्य असं कॅप्शनही त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. अनेक नेटिझन्सने अशाच प्रकारे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या बैठकीतला एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी भाषण करतानाच अडखळले होते. त्यांच्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये बिघाड झाल्याची चर्चा त्यावेळी होत होती. तेव्हाही अनेकांनी पंतप्रधान मोदी गोंधळून गेल्याची, अडखळल्याची टिपण्णी केली होती.